LPG : घरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आर्थिक गणित कोलमडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lpg cylinder

LPG : घरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; आर्थिक गणित कोलमडणार

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने (Inflation) होरपळणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला असून, घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylender) किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामनंतर राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलास मिळाला आहे. (Domestic LPG Cylinder Costlier From Today.)

घरगुती सिलिंडरच्या किमती वाढण्याची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1 तारखेला व्यावसायिक सिलिंडर 198 रुपयांची घट करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा 9 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या दरांच्या घोषणेनंतर आता राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,012 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी यासाठी 2,022 रुपये मोजावे लागत होते .

हेही वाचा: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट; पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार?

नवीन दरांच्या घोषणेनंतर किती पैसे मोजावे लागणार

14.2 किलोच्या सिलिंडरसाठी राजधानी दिल्लीमध्ये 1,053 रुपये, कोलकाता 1,079, मुंबई 1,052, चेन्नई 1,068 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 19 किलोग्रॅम सिलिंडरसाठी दिल्लीकरांना 2,012 रुपये प्रति सिलेंडर, कोलकातामध्ये 2,132, मुंबईत 1,972 तर, चेन्नईकरांना रु. 2,177 रुरये मोजावे लागणार आहेत.

Web Title: Domestic 142 Kg Lpg Cylinders Prices Increased By Rs 50cylinder With Effect From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :inflationLPG cylinders
go to top