esakal | 15 ऑगस्ट 1947नंतरही भारतात होती इंग्रजांची लुडबूड; जाणून घ्या कधी मिळालं खरं स्वातंत्र्य
sakal

बोलून बातमी शोधा

jawaharlal-nehru.jpg

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्याचं आपल्याला माहित आहे, पण भारत खरच स्वतंत्र झाला होता का?

15 ऑगस्ट 1947नंतरही भारतात होती इंग्रजांची लुडबूड; जाणून घ्या कधी मिळालं खरं स्वातंत्र्य

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्याचं आपल्याला माहित आहे, पण भारत खरच स्वतंत्र झाला होता का? तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 15 ऑगस्टच्या रात्री बोलताना देश स्वातंत्र्याच्या युगात जागा होत असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात 1950 पर्यंत भारतावर ब्रिटिशांचेच वर्चस्व होते. किंग जॉर्ज सहावा भारताचा राजा होता तर लॉर्ड माउंटबॅटन देशाचे पहिले गव्हर्नर जनरल होते.  पंडीत नेहरूंनी जरी शपथ घेतली असली तरी सर्व काम हे ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार चालत होतं. कोणत्याही निवडणुकीशिवाय भारतातील नेत्यांना ब्रिटिश राजाच्या नावे शपथ देण्यात आली होती. 

पंतप्रधानांकडून घोषणा नाहीच; पण तीन लशींचे काम प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती

भारत खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला तो 30 जानेवारी 1950 रोजी. या देवशी भारत प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. भारताचं स्वत:चं संविधान लागू झालं. दरम्यान, प्रजासत्ताक होण्याच्या आधीची तीन वर्षे खूप महत्वाची होती. भारताचं स्वत:चं राज्य स्थापित होणं हे सहज शक्य नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबाबत ब्रिटिश सरकारने त्यांची भूमिका बदलली होती. 

साम्राज्याअंतर्गत वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी पहिल्या महायुद्दापासूनच करण्यात येत होती. 1927 मध्ये सायमन कमीशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने याचा विरोध करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठित केली. 1928 मध्ये सर्व पक्षाच्या सभेमध्ये पूर्ण स्वराज्य हे अंतिम उदिष्ठ असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र, त्याआधी तात्काळ वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी करण्यात आली. 

एका वर्षांनतर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद पंडित नेहरुंकडे गेले. नेहरु यांनी संपूर्ण स्वराज हे काँग्रेसचे उदिष्ठ असल्याचे जाहीर केले. साम्राज्याअंतर्गत वसाहतीचे स्वराज्य भारतीयांना कधीही खरे स्वातंत्र्य देऊन शकत नाही. लष्करी आणि आर्थिक नियंत्रण भारतीयांच्या हाती असायला हवे अशी स्पष्ट मागणी नेहरु यांनी केली. 

1947मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? वाचा 74 वर्षांत बदललेला भारत

दुसऱ्या महायुद्धादरम्यान काँग्रेस पक्षाचे आणि ब्रिटिशांचे संबंध अधिक बिघडत गेले. महायुद्धात भारतीयांची मदत मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी अधिक अधिकार देण्याचे मान्य केले. त्यानुसार काँग्रेससोबत बोलणीही सुरु केली. मात्र, काही तोडगा निघू शकला नाही. 1946 मध्ये भारतीय नौदल आणि हवाई दलाने बंड पुकारले, त्यामुळे ब्रिटिशांना कळून चुकले की आता भारतावर राज्य करणे शक्य नाही. 20 फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश भारत सोडून जातील असं त्यांनी जाहीर केलं. 

लॉर्ड माऊंटबॅटन यांना भारताच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, देशातील जातीय हिंसा वाढू लागल्याने ब्रिटिशांनी 9 महिने आधीच भारत सोडण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी भारताचे संविधान तयार होण्यासाठी आणखी वेळ लागणार होता. त्यामुळे माऊंट बॅटन भारताच राहिले. निवडणुका झाल्या नसल्याने काँग्रेस सरकार अजून ब्रिटिश सरकारच्या सल्ल्यानुसार काम करत होते. संविधानाचा मसुदा तयार झाल्यानंतर भारत 1950 मध्ये खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. भारतीयांच्या हाती सत्ता आली.