

Donald Trump US Midterm Election Setback May Affect India US Trade Ties Defence Cooperation and Visa Policy
sakal
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बसलेला जबरदस्त राजकीय धक्का हा केवळ अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणापुरता मर्यादित राहणारा नाही. या निकालामुळे ट्रम्प यांच्या निर्णयक्षमतेवर आणि धोरणात्मक अजेंड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद अमेरिका आणि भारतातील व्यापारसंबंध, संरक्षण सहकार्य, व्हिसा धोरण तसेच जागतिक राजकारणावर उमटू शकतात. ट्रम्प यांच्या कारभारावरील नाराजी यात स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हा कौल जागतिक सत्तासमीकरणे बदलणारा ठरणार की त्यांच्या धोरणांना अधिक आक्रमक वळण देणारा, याकडे आता जगाचे लक्ष लागले असल्याने याची दखल.