esakal | डोनाल्ड ट्रम्प यांची देवासारखी पूजा करणाऱ्या कृष्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची देवासारखी पूजा करणाऱ्या बूसा कृष्णा यांचे निधन झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची देवासारखी पूजा करणाऱ्या कृष्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची देवासारखी पूजा करणाऱ्या बूसा कृष्णा यांचे निधन झाले आहे. तेलंगणाचे बूसा कृष्णा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 

जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांचे लाखो चाहते आहेत. मात्र, तेलंगणातील बूसा ट्रम्प यांचे निस्सिम भक्त होते. जनगामा जिल्ह्यातील कृष्णा यांनी त्यांच्या घरासमोर ट्रम्प यांचा 6 फुटाचा पुतळा उभारला आहे. त्यांची ते रोज न चुकता पूजा करायचे. त्याचबरोबर पुतळ्याचा अभिषेकही ते करायचे. ट्रम्प यांच्यावर प्रेम करणाऱ्या बूसा कृष्णा यांना गावकरी ट्रम्प कृष्णा म्हणून बोलावत असत. 

Forbesची यादी जाहीर: जाणून घ्या भारतातीत सर्वात श्रीमंत महिलांबद्दल

कृष्णा आपल्या घरासमोर उभारलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचे मनोभावे पुजा करायचे. 15 कामगारांनी मिळून ट्रम्प यांचा पुतळा उभारला होता. कृष्णा यांनी ट्रम्प यांची भेट घेण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूने ती पुरी होऊ शकणार नाही. 24 फेब्रुवारी 2020 रोजी डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कृष्णा यांना ट्रम्प यांची भेट घेण्याची इच्छा होती. पण, भेट होऊ शकली नाही. 

कृष्णा यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रती असलेली भक्ती पाहून जगभरात ते चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या घरासमोर असलेला ट्रम्प यांचा पुतळा पाहण्यासाठी दूरवरुन लोक गावात येत असतं. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातच आता कृष्णा यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. गावात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला आहे.