
नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू असताना, अचानक ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली. ट्रम्प येथेच थांबले नाहीत, त्यांनी रशियन तेल खरेदी केल्याबद्दल २५ टक्के दंडही (penalty) लावला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. याचदरम्यान, जर्मनीच्या एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, टॅरिफच्या वादामुळे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला, पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.