जनतेच्या घामाचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनकडे वळवला; भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप

वृत्तसंस्था
Friday, 26 June 2020

संकटकाळात देशबांधवांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोशामधून (पीएमएनआरएफ) ‘यूपीए’च्या सत्ताकाळात राजीव गांधी फाउंडेशनला मोठी देणगी देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली-  संकटकाळात देशबांधवांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोशामधून (पीएमएनआरएफ) ‘यूपीए’च्या सत्ताकाळात राजीव गांधी फाउंडेशनला मोठी देणगी देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. हा सारा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे. 

मोदीजी घाबरु नका, चीनने आपला भूभाग बळकावल्याचं जनतेला सांगा- राहुल गांधी
‘‘देशातील जनतेच्या घामाचा पैसा, जो सार्वजनिक निधी आहे, तो एका घराण्याच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेसाठी देणे हा गंभीर गैरव्यवहारच नव्हे, तर भारताच्या लोकांबरोबर केलेला तो फार मोठा द्रोह आहे,’’ असा हल्ला नड्डा यांनी चढवला आहे. मात्र, थेट पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील या प्रकरणातील नेमका किती पैसा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील या संस्थेकडे देणगी म्हणून वळवण्यात आला, याचा स्पष्ट खुलासा भाजपने आज तरी केलेला नाही. 

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे...
काँग्रेसवर आरोपांच्या फैरी
 
चीन संकटाच्या मुद्द्यावर सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या काँग्रेसला भाजपने तेवढेच तिखट प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून काँग्रेसला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. याच राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून तब्बल ९० लाखांची देणगी २००४ - २००५ मध्ये मिळाल्याचा गौप्यस्फोट भाजपने काल केला होता. आता आपत्तीग्रस्त काळात मदतीसाठी असलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील आणि देशाची संपत्ती मानल्या जाणाऱ्या या निधीतील पैसा काँग्रेसच्या या फाउंडेशनकडे वळवण्यात आल्याचे प्रकरण भाजपने बाहेर काढले आहे. 

मोठी ब्रेकिंग! अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; आता राज्यातील 'एवढ्या...
‘पीएमएनआरएफ’ हा संकटकाळात देशवासीयांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेला सार्वजनिक निधी आहे. त्यातले पैसे ज्या राजीव गांधी फाउंडेशनकडे बेकायदा वळविले, त्याच्या अध्यक्ष कोण होत्या? सोनिया गांधी. या फाउंडेशनमध्ये बसले कोण आहे? त्याच सोनिया गांधी, असं म्हणत नड्डा यांनी टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donations from the Prime Minister's Fund to the Rajiv Gandhi Foundation said jp nadda