मला दुःख देऊ नका!;रजनीकांत यांची चाहत्यांना विनंती

वॉल्टर स्कॉटः सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 12 January 2021

चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे रविवारी (ता. १०) आंदोलन केले. यावर यापुढे अशी आंदोलने करू नये व माझा निर्णय बदलण्यची कोणतीही मागणी करू नये, असे आवाहन चाहत्यांना आज केले.

चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची आस त्यांच्या चाहत्यांना लागली असली तरी खुद्द रजनीकांत यांनी त्याला ठाम नकार दिला आहे. ‘‘मी माझा निर्णय जाहीर केला आहे. तो अंतिम असून त्यात बदल करण्याचा सवालच नाही, असे स्पष्ट करीत राजकारणात येण्यासाठी माझ्यावर सतत दबाव टाकून त्रास देऊ नये, दुःख देऊ नये,’’ अशी कळकळीची विनंती त्यांनी सोमवारी ट्विटद्वारे केली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रजनीकांत यांनी राजकारणात यावे, यासाठी त्यांच्या शेकडो समर्थकांनी व चाहत्यांनी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे रविवारी (ता. १०) आंदोलन केले. यावर यापुढे अशी आंदोलने करू नये व माझा निर्णय बदलण्यची कोणतीही मागणी करू नये, असे आवाहन चाहत्यांना आज केले. ट्विटवरील संदेशात त्यांनी आंदोलन शांतपणे केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नेतृत्व करण्याच्या विनंतीसाठी झालेल्या या आंदोलनात रजनी मक्कल मद्रम (आरएमएम) सदस्य सहभागी झाले नाहीत, त्या रजनी मक्कल मद्रम (आरएमएम) मनापासून धन्यवाद देत रजनीकांत म्हणाले की, मी राजकारणात प्रवेश का करीत नाहीत, याचे कारण मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मी माझ्या निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अशी प्रकारची आंदोलन करू नयेत, अशी विनंती मी करीत आहे. राजकारणात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकून मला त्रास देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. चाहत्यांनी काल केलेल्या या आंदोलनामुळे खूप दुःख झाल्याचेही त्यांनी तमिळ भाषेतून लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विषय तेथेच संपवायला हवा - कमल हसन
रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावरून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्याविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते व मक्कल निधी मैय्यमचे (एमएनएम) संस्थापक कमल हसन म्हणाले की, रजनीकांत यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा विषय तेथेच संपवायला हवा. रजनीकांत या तब्बेतीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली, मात्र त्यांच्या निवेदनावर काहीही भाष्य केले नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donot put pressure on me to get into politics donot hurt me Rajinikanth tweet