अफवांना बळी पडू नका, भारतात अद्याप मंकीपॉक्सचा रुग्ण नाही - Govt

उत्तर भारतात संशयीत रुग्ण सापडल्याच्या चर्चा सुरु आहेत यापार्श्वभूमीवर सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.
nearly 200 cases of monkeypox in more than 20 countries says who
nearly 200 cases of monkeypox in more than 20 countries says who e sakal

नवी दिल्ली : देशात अद्याप मंकीपॉक्सचा रुग्ण आढळेला नाही. त्यामुळं अफवांना बळी पडू नका, असं आवाहन केंद्र सरकारनं जनतेला केलं आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक संशयित रुग्ण आढळल्याची चर्चा देशात सुरु होती. यापार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्ट केलं आहे. (Dont fall prey to rumors there are no monkeypox patients in India yet Central Govt)

एएनआयनं यासंदर्भात सरकारी सुत्रांच्या हवाल्यानं माहिती देताना सांगितलं की, गाझियाबादमध्ये सापडलेल्या संशयीत मंकीपॉक्सच्या रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पण यामुळं अनावश्यक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अद्याप भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आलेला नाही, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

nearly 200 cases of monkeypox in more than 20 countries says who
पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन तात्पुरतं स्थगित!

गाझियाबादमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीला खाज आणि पुरळ येत असल्याची तक्रार आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून तिची मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी सॅम्पल घेण्यात आलं. याशिवाय तिला इतर दुसरा कुठलाही आजार नाही. ती किंवा त्याच्या जवळच्या कुठल्याही नातेवाईकानं गेल्या एक महिन्यापासून परदेशात प्रवास केलेला नाही, अशी माहिती गाझियाबादच्या सीएमओनी दिली. सध्या मंकीपॉक्सच्या या संशयीत रुग्णाला निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. याचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू अकादमी (NIV) इथं पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक यांनी एएनआयला दिली.

nearly 200 cases of monkeypox in more than 20 countries says who
मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, मंकीपॉक्स हा आजार पश्चिमेकडील काही देशांमध्ये वेगान पसरत असल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत आहे. तसेच कोविडच्या लशींमुळं काहींना या नव्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचंही काही वृत्तांमध्ये म्हटलं होतं. पण त्याची कुठलीही पुष्टी होऊ शकलेली नाही. सर्वांगावर कांजिण्यांप्रमाणं पुरळं येणं हे या आजाराची लक्षणं असल्याचं सांगितलं जात आहे. पण अद्याप भारतात अशा प्रकारची कुठलीही केस आढळून आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com