
...तर ‘त्या’ भारतीयांना भारतात नोकरी दिली जाणार नाही
दरवर्षी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी पाकिस्तानात जातात. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि दंत अभ्यासासाठी पाकिस्तानात (Pakistan) जाऊ नये, असा सल्ला नॅशनल मेडिकल कमिशन आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने (National Medical Commission and Dental Council of India) दिला आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनचे सचिव आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सचिवांनी जारी केलेल्या माहितीनुसार, कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याने पाकिस्तानमधील (Pakistan) कोणत्याही वैद्यकीय किंवा दंत महाविद्यालयात डेंटल किंवा एमबीबीएस किंवा समकक्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर तो परदेशी वैद्यकीय म्हटले जाईल. पदवी परीक्षेत सहभागी होऊ दिले जाणार नाही. या पदवीच्या आधारे त्याला भारतात नोकरीही दिली जाणार नाही.
हेही वाचा: राणादा अन् अंजलीबाईचं जमलं! साखरपुड्याचे फोटो व्हायरल
ज्यांनी २०१८ च्या पहिले पाकिस्तानच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे किंवा गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी घेतल्यानंतर अभ्यासासाठी गेले आहेत त्यांनाच येथे नोकरीची परवानगी दिली जाईल. मात्र, पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना दिलासा दिला आहे. त्यात असे नमूद केले आहे की अशा निर्वासितांच्या उच्च शिक्षण पदव्या ज्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे ते गृह मंत्रालयाच्या मान्यतेनंतर भारतातील नोकऱ्यांसाठी पात्र मानले जातील.
नॅशनल मेडिकल कमिशन आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेला सल्ला अशा वेळी आला आहे जेव्हा गुप्तचर संस्था अहवाल देत आहेत की काश्मीरमधून वैध प्रमाणपत्रांवर पाकिस्तानात (Pakistan) शिकण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी नंतर दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. काही वर्षांतच असे १७ विद्यार्थी विविध चकमकीत मरण पावले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आता हा घाणेरडा खेळ खेळत आहे.
Web Title: Dont Go To Pakistan For Medical And Dental Studies Jammu And Kashmir National Medical Commission And Dental Council Of India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..