राणादा अन् अंजलीबाईचं जमलं! साखरपुड्याचे फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Joshi and Akshaya Deodhar got engaged

राणादा अन् अंजलीबाईचं जमलं! साखरपुड्याचे फोटो व्हायरल

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांचा मंगळवारी (ता. ३) साखरपुडा पार पडला. मालिकेने निरोप घेतल्यानंतरही दोघे नेहमीच चर्चेत होते. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. (Hardik Joshi and Akshaya Deodhar got engaged)

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक (Hardik Joshi) घराघरांत पोहोचले होते. त्यांची जोडी प्रत्येकाला पसंत होती. ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत होते. त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. मालिका संपल्यानंतरी ते नेहमी चर्चेत होते. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. आता पुन्हा एकदा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारणही तितकंच खास आहे. कारण, दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.

अक्षया (Akshaya Deodhar) आणि हार्दिक यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळाला होता. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडली होती. आता त्यांनी साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. हार्दिक जोशीने साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये अक्षया (Akshaya Deodhar) ही हार्दिकच्या (Hardik Joshi) मांडीवर बसताना आणि रिंग घालताना पाहायला मिळत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य बरेचकाही सांगून जाते. मालिकेत साकारलेली जोडी आज प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री अक्षया देवधरने फोटो शेअर करताना अहाSS फायनली Engaged असे शब्द टाकलेत. कदाचित रिल लाईफमध्ये जे काही घडले ते रिअल लाईफमध्येही घडेल यावर तिचा विश्वास नसावा. अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. मालिकेतील त्यांची नावही तितकीच गाजली होती. ‘पाठक बाई आणि राणा दा’ अशी नाव त्यांची होती.

Web Title: Hardik Joshi And Akshaya Deodhar Yancha Sakharpuda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EngagedAkshaya Deodhar
go to top