लोकांची दिशाभूल करू नका; उच्च न्यायालयाने रामदेव बाबांना फटकारलं

Ramdev baba
Ramdev babaGoogle file photo
Updated on

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात भारतात थैमान घातलं होतं. त्याच काळात रामदेबाबा यांनी कोरोना बरा करण्याचा दावा करत कोरोनील औषधाची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे कोरोनीलच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील होते. त्या काळात रामदेव बाबा यांनी ऍलोपॅथी उपचारांवर टीका केली होती. आता उच्च न्यायालयाने यावरून रामदेव बाबा यांना फटकारलं आहे. (Baba Ramdev news in Marathi)

Ramdev baba
बिहारमधील 72 टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल; मुख्यमंत्री, उपख्यमंत्र्यांविरोधातही गुन्हे

उच्च न्यायालयाने म्हटल की, अ‍ॅलोपॅथी आणि कोविड-19 च्या उपचारांबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत काहीही कोणाचीही दिशाभूल करू नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बाबा रामदेव यांच्यावर कोविड-19 च्या उपचाराबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे.

बाबा रामदेव यांनी कोविड -19 च्या काळात डॉक्टरांनी केलेल्या उपचारपद्धतीवर टीका केली होती. 2021 मध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'कोविड-19 साठी अॅलोपॅथीची औषधे घेतल्यानंतर लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं', बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. बाबा रामदेव यांच्या या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तर दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले, आयुर्वेदाची प्रतिष्ठा वाचवणे गरजेचं आहे. मात्र अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये हा आमचा उद्देश आहे. मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे, पण लस विसरा असं म्हणणे चूक आहे. त्यामुळे लस घ्या, असही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com