
आगीशी खेळू नका; CAA च्या विधानावर ममतांचे शहांना प्रत्युत्तर
कोलकाता : कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज पश्चिम बंगालमध्ये केले आहे. त्यानंतर आता पश्मिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रत्युत्तर देत आगीशी खेळू नका असे म्हणत जनता चोख उत्तर देईल, असे विधान केले आहे. तुम्ही केंद्रीय गृहमंत्री असून, मी तुमचा आदर करते. मात्र, याचा अर्थ मला मार्गदर्शन करणे किंवा बीएसएफला राज्यावर सत्ता गाजवायला सांगणे असा होत नाही असेही ममता यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार सीएए विधेयक संसदेत का आणत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ नये असे वाटते. यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असून, एकता हीच आपली ताकद असल्याचे ममता म्हणाल्या. (Mamata Banerjee Reaction On Amit Shah CAA Statement)
गाईची तस्करी, घुसखोरी रोखणे आणि सीमेवर शांतता राखणे हे पाहणे आपले कर्तव्य असून, दिल्लीच्या जहांगीरपुरी, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काय झाले त्याकडे गृहमंत्र्यांनी बघावे. बंगालची चिंता करू नये असेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. भाजपचे काम फुटीरता निर्माण करण्याचे असून, केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत ईदच्या दिवशीही हिंसाचार केल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
Web Title: Dont Play With Fire Mamatas Reply To Shah On Caas Statement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..