भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ नका...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत असून, हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ नका, अन्यथा मारुतीराया भाजपाच्या लंकेचे दहन करेल, अशी टीका राज बब्बर यांनी केली आहे.

नवी दिल्लीः रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत असून, हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ नका, अन्यथा मारुतीराया भाजपाच्या लंकेचे दहन करेल, अशी टीका राज बब्बर यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना राज बब्बर म्हणाले, 'भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ नका. भाजपला तीन राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. या निवडणूक निकालांवरून धडा घेत भाजपचे वाचाळवीर गप्प बसले नाही तर भगवान हनुमान भाजपच्या लंकेचे दहन करेल.'

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हा मुस्लिम असल्याचा शोध लावला आहे. हनुमानजी सर्वांचे असून, माझ्या मतानुसार ते मुसलमान होते, असे नवाब म्हणाले. "मुसलमानांमध्ये रेहमान, रमजान, फर्मान, झिशान, कुर्बान अशी नावे असतात. त्यांच्यातील अनेक नावे हनुमान या नावाशीच साधर्म्य दाखवितात, त्यामुळे हनुमानजी हे मुसलमान होते,' असे नवाबसाहेबांचे म्हणणे आहे.

योगींनी हनुमान दलित असल्याचे म्हटल्यावर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावरून जनतेनेही याबाबत टीका केली होती. देवाला जाती-धर्मात अडकविण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त झाली होती. मात्र, हा वाद येथे न थांबता आता भाजप सोडून गेलेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी हनुमान दलित असून, त्याने भगवान रामासाठी सर्वकाही करूनही त्याला शेपूट चिकटविले गेले, असा दावा केला होता. भोपाळमधील एका जैन मुनीने तर हनुमान जैन असल्याचा दावा केला होता. उत्तर प्रदेशचे धार्मिक व्यवहारमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला होता. स्पष्टीकरण देताना चौधरी म्हणाले, की "रामाची पत्नी असलेल्या सीतेचे रावणाने अपहरण केले होते; पण लंका मात्र हनुमानाने जाळली. येथे एका व्यक्तीने दुसरीवर अन्याय केला होता; पण तिसऱ्याचे मात्र याच्याशी काही देणेघेणे नसताना त्याने यात हस्तक्षेप केला. हा स्वभाव जाटाचा आहे. आजही कोठेही अन्याय झाला तर जाट आधी प्रतिकार करतो.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont trouble Hanuman too much says Raj Babbar to BJP