काँग्रेसचा कचरा आम्हाला नको; केजरीवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचा कचरा आम्हाला नको; केजरीवाल
काँग्रेसचा कचरा आम्हाला नको; केजरीवाल

काँग्रेसचा कचरा आम्हाला नको; केजरीवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमृतसर : सध्या पंजाब दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना आज काँग्रेसवर निशाणा साधला. ‘‘आम्हाला काँग्रेसमधील कचरा नको आहे, आम्ही मनात आणले तर काँग्रेसचे २५ आमदार आणि २ ते ३ खासदार सायंकाळपर्यंत पक्षामध्ये आणू शकतो.’’ असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

केजरीवाल म्हणाले, ‘‘ प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी न मिळणारा एखादा तरी नेता नाराज असतो. अनेकदा त्यांची मनधरणी करण्यात येते, काहींची नाराजी दूर होते तर काहीमंडळी पक्ष सोडून जातात. काँग्रेसमधील अनेक नेते मंडळी आमच्या संपर्कात आहेत पण आम्हाला पक्षामध्ये कचरा घ्यायचा नाही. तुमचे किती आणि आमचे किती अशी स्पर्धा करायची झाली तर आज सायंकाळपर्यंत २५ आमदार फोडू शकतो. त्याच पक्षाचे अन्य दोन ते तीन खासदार देखील माझ्या संपर्कात आहेत. हे सगळे घाणेरडे राजकारण असून आम्हाला त्यामध्ये पडायचे नाही.’’

सर्वप्रथम उमेदवार जाहीर करू

‘‘राज्यातील निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतील तसे आमचा पक्षच सर्वप्रथम मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल. जवळपास सर्वच पक्ष अशापद्धतीने रणनीती आखत असतात. काँग्रेसने देखील मागील निवडणुकीत असेच केले होते. उत्तरप्रदेशात भाजपने देखील असाच प्रयोग करत ऐनवेळी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता.’’ असे केजरीवाल यांनी नमूद केले.

loading image
go to top