

Khandwa's Musical Heritage: The 100-Year-Old House That Keeps Kishore Kumar Alive
esakal
आपल्या आवाजाने, अभिनयाने आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे गायक-अभिनेते किशोर कुमार यांचे जन्मघर असलेले 'गौरीकुंज' सध्या देखभालीअभावी जीर्णावस्थेत पोहोचले आहे. मुंबईत मोठे यश मिळवूनही त्यांचे मन कायम खंडव्यातच रमत असे. "दूध-जलेबी खाएंगे, खंडवा में बस जाएंगे" हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या जन्मगावावरील प्रेमाची साक्ष देते.