esakal | पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी अजूनही खुले; काँग्रेसने दिली परतीची साद
sakal

बोलून बातमी शोधा

3rajashan.jpg

भाजपकडून सचिन पायटल यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे, तर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा त्यांना पक्षात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी अजूनही खुले; काँग्रेसने दिली परतीची साद

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जयपूर- राजस्थानमध्ये काँग्रेसकडून सचिन पायलट यांना दूर करण्यात आले आहे. असे असले तरी पायलट यांचं पुढचं पाऊल काय असले याबाबत सांशकता आहे. भाजपकडून सचिन पायटल यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे, तर राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा त्यांना पक्षात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पांडे यांच्या या ट्विटने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले आहे.  

चीनसंदर्भातील त्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले; नाही म्हणजे नाहीच....
सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. देव त्यांना सदबुद्धी देवो आणि त्यांना त्यांची चुक लक्षात येवो. माझी प्रार्थना आहे की भाजपच्या मायावी जाळ्यातून ते बाहेर निघावेत, असं ट्विट अविनाश पांडे यांनी केलं आहे.  यावरुन काँग्रेस पक्ष अजूनही सचिन पायलट यांना गमावू इच्छित नाही असं दिसत आहे. मात्र, पायलट याला कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल.

पांडे यांच्या ट्विटने पुन्हा राजनैतिक चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, सचिन पायलट यांची राजकीय वाटचाल असून स्पष्ट नाही. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं आहे की ते भाजपमध्ये जाणार नाहीत. मला बदनाम करण्यासाठी भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेसमधील हाय कमांडसमोर मी माझी बाजू मांडली, पण त्यातून मार्ग काढण्याऐवजी माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचंही पायलट म्हणाले आहेत.

भारतात कुपोषितांची संख्या घटली; किती ते वाचा सविस्तर
दरम्यान, मंगळावरी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून हटवण्यात आले आहे. यांच्या जागी गोविंद सिंह दोतासरा यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर केला होता. पायलट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पण, सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पायलट यांचे पुढील मार्गक्रमण कसे असेल याकडे लक्ष्य असणार आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता सचिन पायलट हेही बाहेर पडल्याने काँग्रेसची पीछेहाट होण्याची शक्यता आहे.