

Missing Married Woman Found Alive After Five Months
Esakal
हुंडाबळी प्रकरणी सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला पण सून ५ महिन्यांनी जीवंत सापडल्यानं आता खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातल्या श्रावस्ती इथल्या मल्हीपूर पोलीस ठाण्यात हुंडाबळी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने या प्रकरणात महिलेच्या हत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हाही दाखल केला. आता तीच महिला पाच महिन्यांनी जीवंत सापडली आहे. पोलिसांनी महिलेला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.