हजाराच्या नव्या नोटेवर डॉ. आंबेडकर?

संजय मिस्किन : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई - चलनी नोटांशिवाय राजकारण म्हणजे स्वप्नरंजनच. मात्र, चलनी नोटांवरून राजकारण हा नवा प्रकार भारतात रूजतोय की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रद्द केलेल्या एक हजार रूपयांच्या नोटांच्याऐवजी केंद्र सरकार नवी हजाराची नोट आणत आहे आणि या नोटेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

भारताच्या नोटांवर महात्मा गांधी आणि राष्ट्रीय प्रतिकांचा आतापर्यंत समावेश आहे. गांधींच्या बरोबरच किंवा स्वतंत्रपणे घटनाकार आंबेडकर यांचाही फोटो घेतला जाईल, अशी शक्‍यता वरीष्ठ पातळीवर व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांचा फोटो नव्या नोटेवर छापून सर्वच राजकीय पक्षांना धोबीपछाड द्यायचा घाट केंद्र सरकारने; विशेषतः भाजपच्या गोटाने घातला आहे. चलनी नोटांवर आंबेडकरांची प्रतिमा असावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीने सातत्याने लावून धरली आहे. "किती शोभला असता भिम नोटावर...टाय अन्‌ कोटावर...!' हे गाणंही गाजले होते. आता मोदी सरकार डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा हजाराच्या नोटेवर छापून संपुर्ण दलित समाजाला भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Ambedkar's photo on currency notes?