esakal | लशीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी डॉ. कांग यांनी सांगितला उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Gagandeep Kang

लशीकरण मोहीम खंडीत होऊ नये यासाठी डॉ. कांग यांनी सांगितला उपाय

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा (corona vaccine) असल्याने सध्या राष्ट्रीय लशीकरण मोहीम मंदावली आहे. ही मोहीम सुरळीत पार पडावी यासाठी डॉ. गगनदीप कांग (Dr. Gagandip Kang) यांनी उपाय सुचवला आहे. पंजाबमधील लशीकरण तज्ज्ञांच्या गटाच्या डॉ. कांग या प्रमुख आहेत. तसेच देशातील मेडिकल ऑक्सिजन नियोजन समितीवर सुप्रीम कोर्टाद्वारे नियुक्त सदस्य आहेत. (Dr Gagandip Kang gives solution on slow camaign of corona vaccination in India due to shortage)

डॉ. कांग म्हणाल्या की, "देशात सध्या लशीकरण मोहिम मंदावली आहे. यामागे लशींचा तुडवडा आणि मर्यादीत पुरवठा ही कारणं आहेत. लशीकरण मोहिम सुरळीत सुरु राहण्यासाठी अधिक डोससची गरज होती. मात्र, लस बनवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन वाढवल्यानंतरच लशीकरणाचा वेगही वाढेल."

"कोरोनापासून संरक्षणासाठी देशातील जास्तीत जास्त जनतेचं लशीकरण व्हावं आणि या लशीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी इतर पर्यायही आपल्याला शोधावे लागलतील. जर आपल्याला लशींची आयात करणं शक्य असेल तर हा एक पर्याय आहे. पण सध्या जगातीक स्तरावरच लशींचा तुटवडा आहे. त्यातही फक्त रशिया आणि चीनकडेच अतिरिक्त लस उपलब्ध आहेत. त्यामुळे जोपर्यंत भारतीय कंपन्या आपल्या लशींचं उत्पादन सुरु करत नाहीत तोपर्यंत या दोन देशांपैकी कोणाकडून आपण लस विकत घेण्यास इच्छूक आहोत, हे आपल्याला ठरवावं लागेल," असंही यावेळी डॉ. कांग यांनी सांगितलं.

अमेरिका-कॅनडानं लहान मुलांसाठी लशीकरण सुरु केलं आहे. जगातील इतरही देश लहान मुलांसाठी लशीकरण सुरु करतील. जगातील श्रीमंत देश हे आधी आपल्या नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांच कोरोनापासून रक्षण व्हावं यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करतील. त्यांनतर उर्वरित जगाला लस उपलब्ध झाल्याचं आपल्याला पहायला मिळेल, असं डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं.