
नवी दिल्ली : देशातील आधुनिक अर्थक्रांतीचे प्रणेते मानले जाणारे डॉक्टर साब ऊर्फ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शासकीय इतमामात साश्रू नयनांनी आज अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील निगमबोध घाट स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शीख परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्येनेच भडाग्नी दिल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले.