Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary : देशातल्या पहिल्या जागतिक कृषी प्रदर्शनात भाऊसाहेबांना कोण म्हणाले 'हमारा पंजाबराव पंजाबदा'!

या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या
Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversaryesakal
Updated on

पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डीसेंबर 1898 रोजी विदर्भातील एका लहानशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे शामराव आणि आईचे राधाबाई होते. शेतकरी कुटूबांतील जन्म, त्यामुळे पंजाबरावांना शेतीमधील खडानखडा माहीती होती. त्याचाच फायदा त्यांना त्यांच्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात झाला. त्यांचे मुळ आडनाव कदम असे होते परंतु गावातील देशमुखीमुळे त्यांना देशमुख या नावानेच प्रसिध्दी मिळाली.

डॉ. पंजाबराव देशमुख (भाऊसाहेब) यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.

भाऊसाहेबांनी तिसरीपर्यंत पापळ गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांना चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथीच्या शिक्षणासाठी दाखल करण्यात आले. कारंजा येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून मॅट्रिकच्या प्रमाणपत्रासह पदवी प्राप्त केली. मध्यंतरी शिक्षणासाठी भाऊसाहेब पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गेले.

Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
Tunisha Sharma : गप्प आहोत म्हणजे कमजोर नाहीत....तुनिषा प्रकरणामध्ये शीजानच्या बहिणींची प्रतिक्रिया

इंग्लंडमध्ये त्यांनी एम्. ए. एडिंबरो येथे तर डी. फिल्. ऑक्सफर्ड विद्यापिठात पूर्ण केले. बार ऍट लॉ या पदव्या मिळविल्या. ‘वैदिक वाङ्‌मयातील धर्माचा उद्‌गम आणि विकास’ प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले. व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली. गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी ते डॉक्टर बनले आणि गरीब आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणारे बॅरिस्टर झाले.

पंजाबरावांनी १९२७ मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य यांच्याशी विवाह केला. त्यामुळे विदर्भात, विशेषतः मराठा समाजात खळबळ उडाली. पंजाबराव हे सत्यशोधकी व समतावादी विचाराचे नेते होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जात या शब्दाला देखील थारा नव्हता. पण त्या काळचा समाज हा आजच्या पेक्षा कितीतरी पटीने कर्मठ व धर्मभोळा आणि कथाकथित अब्रुला चिकटून असलेला होता. त्याकाळी अस्पृश्यता व अघोरी कर्मकांड याचे स्तोम माजले असताना कुणी अंतरजातीय विवाह करणे त्या समाजाला पटणारे नव्हते.

Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
Congress News: "2500 किमी चालूनही…"; दिल्लीच्या थंडीत T-Shirtवरील राहुल गांधींचा फोटो NCP नेत्याने केला शेअर

पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत. पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले. या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. १३  आणि १४ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आणि भाऊसाहेबांनी अमरावती येथे मंदिर प्रवेशासाठी परिषद बोलावली. मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. हा महाराष्ट्रातील पहिला मंदिरप्रवेश सत्याग्रह होता.

१९३० मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले. तथापि १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले. १९२६ मध्ये बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय आणि १९३२ मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली.. त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली.

Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
Volodymyr Zelenskyy : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा PM मोदींना फोन; नेमक काय झालं बोलणं?

आमरावतीतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पंजाबरावांनी १९३१ मध्ये अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात हे महाविद्यालय कचरा महाविद्यालय म्हणून ओळखले जात असे. त्या संस्थेत आता १५४ हून अधिक संस्था आहेत. ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा डॉ.पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषिमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले.

Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
Health Tips For Winter : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अंघोळीचे पाणीच करेल मदत!

डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी ७ फेब्रुवारी १९५५ रोजी भारत कृषक समाजाची स्थापना करून संपूर्ण शेतकरी समाजाला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ निर्माण करून दिले होते. भाऊसाहेबांनी १९५५ मध्ये “भारत कृषक समाज” ची स्थापना केली. डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी १९५९ मध्ये दिल्ली येथे “जागतिक कृषी प्रदर्शना” ला हजेरी लावली. भाऊसाहेब राष्ट्रीय कृषीसह अनेक संस्थांचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.

राजधानी दिल्लीत डॉ. पंजाबरावांनी ११ डिसेंबर १९५९ ते २९ फेब्रुवारी १९६० या कालावधीत अपूर्व असे जागतिक कृषी प्रदर्शन भरविले. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, पोलंड, फ्रान्स, ब्रिटन, कोरिया, इराण, सिलोन, मंगोलिया, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी इ. राष्ट्रे सहभागी झाली होती. ११ डिसेंबर १९५९पासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी देश-विदेशांतून लाखो शेतकरी आले होते. भारत कृषक समाजाने शेतकऱ्यांसाठी हजारो राहुट्या उभारल्या होत्या. संपूर्ण दिल्ली शहरात जिकडेतिकडे भिन्न भाषा बोलणारे, भिन्न वेष धारण केलेले कृषक आले होते. दिल्ली शहराला अफाट यात्रेचे स्वरूप आले होते. लाखो कृषकांनी हा अपूर्व सोहळा अनुभवला. या प्रदर्शनाचे स्वरूप विराट होते.

Dr. Panjabrao Deshmukh Birth Anniversary
China Covid-19 Outbreak : चीनमध्ये चाललंय काय? प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम केला रद्द

कृषी-क्रांतीचा उषःकाल निश्चित होणार असा विश्वास त्यावेळी संपूर्ण शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाला. पंजाबपासून तर कन्याकुमारीपर्यंत शेतकऱ्यांचे जबरदस्त संघटन उभे झाले. पंजाबचे शेतकरी तर 'हमारा पंजाबराव पंजाबदा' असे संबोधू लागले. त्याचवेळेस खऱ्या अर्थाने कृषिक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकंदरीत डॉ. पंजाबरावांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्याला जागतिक दर्जा मिळवून दिला. जगात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. माझा शेतकरी/शेतमजूर हा भारताचा राजा झाला पाहिजे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते. १९६५ मध्ये दिल्ली येथे पंजाबरावांचे हृदयविकाराने निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com