Health Tips For Winter : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अंघोळीचे पाणीच करेल मदत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips For Winter

Health Tips For Winter : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी अंघोळीचे पाणीच करेल मदत!

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून दोनवेळा अंघोळ करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कोरोना काळात तर लोक चारवेळा अंघोळ करायचे. पालेभाज्यांना तर दोन दोन मिनिटाला पाण्यात बुडवले जायचे. याचे कारण म्हणजे अंघोळ केल्याने शरिरावरील जंतू नाहिसे होतात. त्यामूळे अंघोळीच्या बाबतीत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी अंघोळीच्या पाण्यात औषधे टाका. पाणी जंतू विरहीत करा आणि मगच वापरावे, यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. पण, तूम्हाला खरंच आजारांपासून दूर रहायचे असेल तर अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिक्स करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुरटी

शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी तुरटी गुणकारी ठरते. तुरटी ही त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. त्यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. तुरटी गढूळ पाणी स्वच्छ करायला मदत करते तसेच ती शरिरातील, त्वचेतील आजार बरे करते.

हेही वाचा: Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

सैंधव मीठ

आपल्या शरीराला अनेकदा दुर्गंधी येत असते. ही दुर्गंधी घालवण्यासाठी सैंधव मिठाचाही मोठा फायदा होतो. त्यासाठी साधं पाणी कोमट करून घ्यावं. त्यात सैंधव मीठ मिक्स करा. यामूळे शरीरातील दुर्घंदी दूर होते.

कडूलिंब

फंगल इन्फेक्शनवर कडूलिंबाची पाने औषधासारखी काम करतात. याच्या नियमीत वापराने अनेक आजार दूर होतात.

हेही वाचा: Face Beauty: येत्या क्रिसमस पार्टीत चेहऱ्यावर एक्स्ट्रा ग्लो हवाय; मग करा हा सोपा उपाय

लिंबू

लिंबू हे आंबट रसाळ फळ असले तरी ते वजन कमी करणे, त्वचेसाठी, केसांसाठी गुणकारी ठरते. त्यामूळे अंघोळीच्या पाण्यात लिंबू मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ करा.

हेही वाचा: Skin Care : हिवाळ्यातील कोरड्या हवेत अशी घ्या त्वचेची काळजी

ग्रीन टी

ग्रीन टी पिण्यासाठी वापरतात. पण, त्याने अंघोळ करणेही फायद्याचे असते. दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी ग्रीन टीने केलेल्या अंघोळीचा चांगलाच फायदा होऊ शकतो.

पूर्वी अंघोळीचे पाणी चुलीवर तापवले जायचे. तर काही ठिकाणी बंब वापरला जायचा. त्या पाण्यात कडूलिंबाचा पाला घातला जायचा. त्यामूळे आजार दूर राहण्यास मदत व्हायची. पण आता गिझर, सोलरच्या पाण्यात हा पाला कसे मिक्स करणार हे एक कोडेच आहे. त्यासाठी एका छोट्या पातेल्यात कडूलिंब शिजवून घ्या. आणि ते पाणी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा.

टॅग्स :BathWinterhealth