
मुर्मू भारताच्या दुष्ट तत्वज्ञानाचं प्रतिनिधित्व करतात; काँग्रेस नेत्याचं आक्षेपार्ह विधान
नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुष्ट तत्वज्ञानाचं प्रतिनिधित्व करतात असं आक्षेपार्ह विधान काँग्रेस नेते अज्योय कुमार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. यामुळं आता काँग्रेसला मोठ्या टीकेला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे. (Draupadi Murmu represents evil philosophy of India says Congress leader Ajyo Kumar)
एएनआयशी बोलताना अज्योय कुमार म्हणाले, राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू या चांगल्या उमेदवार आहेत पण विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा हे देखील चांगले उमेदवार आहेत. मुर्मू या भारताच्या अत्यंत दुष्ट तत्वज्ञानाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळं आपण त्यांना आदिवासींचं प्रतीक बनवू शकत नाही. आपल्याकडे रामनाथ कोविंद हे दलित राष्ट्रपती असताना हाथरसची घटना घडली. यावर त्यांनी एक शब्द तरी उच्चारला का? उलट त्यांच्या काळात देशातील अनुसुचीत जातींची अवस्था खूपच वाईट बनली.
हेही वाचा: "रडीचा डाव" म्हणणाऱ्या केसरकरांना संजय राऊतांचं उत्तर; म्हणाले, मग तुम्ही...
दरम्यान, काँग्रेस नेत्याच्या या आक्षेपार्ह विधानानंतर भाजपनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, काँग्रेसनं मुर्मू यांचा अपमान केला आहे.
Web Title: Draupadi Murmu Represents Evil Philosophy Of India Says Congress Leader Ajyo Kumar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..