आर्य नव्हे तर, 'हे'च आहेत मूळ भारतीय

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 September 2019

- भारतात कोणीही बाहेरून आले नाही
- जगातील 13 संशोधन संस्थांच्या संशोधनामुळे इतिहास बदलला

पुणे ः वायव्येकडे राहणारे गोऱ्या कातडीचे "आर्य' हजारो वर्षांपूर्वी भारतात आले. त्यांनी इथल्या मूळ निवासींना दक्षिणेकडे पिटाळले, असा सिद्धांत आज पर्यंत मांडण्यात येत होता. या सिद्धांताला छेद देत प्राचीनकाळी भारतात कोणीही बाहेरून आले नाही. इथे राहणारे लोकसमुह हजारो वर्षांपासून येथेच राहत आहे आणि त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही, असे वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले आहे.

पुण्यातील डेक्कन कॉलेज, हार्वड मेडिकल स्कूल, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बिरबल सहानी इन्स्टिट्यूट अशा जगभरातील 13 संशोधन संस्थांमधील 28 शास्त्रज्ञांनी यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध केले आहे. डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या चमूने हे संशोधन केले. हरियानातील प्रसिद्ध हडप्पा कालीन राखीगढी येथील पाच हजार वर्षांपूर्वीच्या 61 नर सांगाड्यांच्या जनुकीय अभ्यासा करण्यात आला. त्यातून मिळालेली जनुकीय संरचना ही प्राचीन आर्यांच्या जनुकीय संरचनेशी मेळ खात नाही. याचा अर्थ आर्य बाहेरून आल्याचा सिद्धांतच चुकीचा आहे.

भारतात 8 हजार वर्षांपूर्वीच शेतीला सुरवात झाली आणि त्यानंतर इराण, इराकच्या मार्गाने संपूर्ण जगात शेतीचे तंत्र पसरल्याचे संशोधनात समोर आले. दक्षिण आशियातील भाषांचाही यात अभ्यास करण्यात आला. यामध्ये ईसा पूर्व दुसऱ्या सहस्रकाच्या सुरवातीला या भाषा पूर्व युरोपातून दक्षिण आशियात पसरल्या आहे. तसेच प्राचीन हडप्पावासीयांचा इराण मधील पशुपालक, शेतकरी यांच्याशी कोणताही संबंध नव्हता हे संशोधनात सिद्ध झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dravidians are real indian hot aryans deccan college pune dr. vasant shinde research