DRDO ने बनवला होता 'मिरची बॉम्ब'

DRDO ने बनवला होता 'मिरची बॉम्ब'

"Raja Mirchi" नागालँडची खास 'राजा मिरची' आता इंग्लडच्या लोकांची चव वाढवणार आहे. राजा मिरची संपूर्ण जगात तिच्या तिखटपणासाठी लोकप्रिय आहे. विश्वास बसणार नाही पण DRDO ने या मिरचीपासून 'मिरची' बॉम्ब' बनवला आहे. या मिरचीच्या निर्यातीमुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

लंडनमधल्या लोकांच्या जिभेवर राजा मिरचीचा ठसका

ईशान्य क्षेत्रातील GI म्हणजे भौगोलिक संकेत (Geographical indication) संबंधी प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नागालँडच्या 'राजा मिरची' ला पहिल्यांदाच लंडनला एक्सपोर्ट केले आहे. या मिरचीला किंग चिली सुद्धा म्हटले जाते. किंग चिलीला स्कोविल हीट यूनिट्स (SHUs) च्या आधारवर जगातील सगळ्यात तिखट मिरची मानली जाते. मिरचीच्या या पहिल्या लॉटला नागालँडच्या पेरेन जिल्ह्यातील तेनिंगमधून मागवण्यात आले होते आणि गुवाहाटीतील APEDA (Agricultural & Processed Food Products Export Development Authority) च्या सहाय्याने पॅकहाऊसमध्ये पॅक केले गेले.

DRDO ने बनवला होता 'मिरची बॉम्ब'
...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

2008 मध्ये मिळाले GI सर्टिफिकेशन

नागालँडच्या या मिरचीला 'भूत जोलोकिया' आणि 'घोस्ट पेपर' सुद्धा म्हटले जाते. या मिरचीला 2008 मध्ये GI सर्टिफिकेशन मिळाले होते. एपीडाने नागालँड राज्य कृषि विपणन मंडळ (NSAMB) च्या सहयोगाने राजा मिरचीच्या निर्यातीचा पहिला लॉट निवडला. पुढे जून आणि जुलै 2021 मध्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी याचे नमूने पाठवण्यासाठी NSAMB सोबत कॉर्डिनेशन केलं आणि तपासणीचा निकाल अतिशय चांगला होता कारण या मिरचीचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीचे होते.

DRDO ने बनवला होता 'मिरची बॉम्ब'
शिवसेना भवन तोडू, हे बोलणे रोगट लक्षण!

लवकर खराब होते ही मिरची

राजा मिरची लवकर खराब होत असल्याने हिला एक्सपोर्ट करणे एक मोठे आव्हान होते. नागालँडची किंग चिली सोलानेसी परिवारातील शिमला मिरचीच्या प्रजातीशी संबंधित आहे. नागा राजा मिरची जगातील सगळ्यात तिखट मिरची आहे आणि एसएचयूच्या आधारवर जगातील सगळ्यात तिखट मिरचीच्या लिस्टमध्ये टॉप 5 मध्ये हीचा नंबर कायम असतो एपीडा APEDA (Agricultural & Processed Food Products Export Development Authority) मुळे ईशान्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित राहील सोबतच ईशान्येकडील राज्यांना निर्यात नकाशावर आणण्यासाठी उपक्रम सुरू आहे. APEDA च्या मदतीने 2021 मध्ये त्रिपुराच्या फणसाला लंडन आणि जर्मनी, आसामच्या की लिंबुंना लंडन, आसामच्या लाल तांदळाला अमेरिका आणि लेटेकु 'बर्मी ग्रेप' ला दुबई एक्सपोर्ट करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com