esakal | ...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलत आहेत. त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला.

देसाई म्हणाले की, नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे.

हेही वाचा: झिका नेमका कसा पसरतो? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार

मी दहा वेळा सांगितले आहे. मी अगोदर शिवसैनिक आहे, नंतर मंत्री! पण आम्हाला उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, की या आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढा. पक्ष प्रमुखांनी आम्हाला शांत रहायला सांगितले आहे म्हणूनच आम्ही शांत आहोत, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री राणे यांना दिला आहे.

हेही वाचा: HSC Result 2021 : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

loading image
go to top