पंतप्रधानांचे निवास आणि ताफ्याच्या सुरक्षेसाठी एँटी-ड्रोन सिस्टिम; देशातच होणार उत्पादन

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 29 November 2020

मोदींची सुरक्षा वारंवार अपग्रेड केली जाते

नवी दिल्ली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दहशतवादी आणि शत्रू देशांच्या निशाण्यावर असतात. त्याचमुळे त्यांच्या सुरक्षासंबंधी आव्हाने सतत वाढत आहेत. मोदींची सुरक्षा वारंवार अपग्रेड केली जाते. याच पार्श्नभूमीवर पंतप्रधान निवासासह आता त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यालाही अँटी ड्रोन सिस्टिमने सुसज्ज केले जाणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने (DRDO)  सुरक्षा दलांसाठी बनवण्यात येणाऱ्या अँटी ड्रोन सिस्टिमच्या उत्पादनासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स सोबत करार केला आहे. 

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री सुरक्षा टीममध्ये ड्रोनला पाडणाऱ्या सिस्टिमचा समावेश करण्यात येईल. ज्यामुळे पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होईल. पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी अँटी ड्रोन सिस्टिम ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कारण, यावर्षीच्या सुरुवातीपासून त्यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा धोका वाढला आहे. 

मोदींनी  'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले ब्राझीलचे जॉनस कोण आहेत?...

पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांनी हल्ला करण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करी करण्यासाठी भारताच्या सीमेवर चीन निर्मित ड्रोनचा वापर सुरु केला आहे.  डीआरडीओ दोन प्रकारचे अँटी ड्रोन तयार करण्याच्या कामात गुंतली आहे. जेणेकरुन ड्रोनला निष्क्रिय किंवा पाडणे शक्य होईल.

यावर्षीच्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्रदिनाच्या सोहळ्यादरम्यान अँटी ड्रोन सिस्टिम लावण्यात आली होती. या अँटी ड्रोनमध्ये सिस्टिम रेडार कॅपॅबिलीटी आहे. ज्यामुळे तीन किलोमीटर अंतरावरुनच शत्रूच्या ड्रोनला पाडणे शक्य होते. अँटी ड्रोन सिस्टिमध्ये दोन-तीन किलोमीटर दूरच्या ड्रोनला लेझर बीमच्या सहाय्याने पाडण्याचीही क्षमता आहे. 

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानने भारतीय सीमेवर ड्रोन पाठवून शस्त्र आणि ड्रग्ज तस्करी वाढवली आहे. चीनमध्ये तयार झालेला हा ड्रोन 10 किलोपर्यंचे वजन उचलू शकते. त्यामुळे याविरोधात योजना बनवणे आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सीमेवर अँटी ड्रोन सिस्टिम  तैनात केले जात आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRDO ready with anti drone system for armed forces and narendra modi