Lok Sabha Election : पत्नीच्या मदतीने संसद प्रवेशाचे स्वप्न; ‘बाहुबली’ पतीऐवजी निवडणूक रिंगणात ; उज्ज्वलकुमार

यामध्ये राज्यातील ‘बाहुबली’ नेत्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

पाटणा : बिहारमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपसह महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी लोकसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राज्यातील ‘बाहुबली’ नेत्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

Lok Sabha Election
Summer Health Care : उन्हाळ्यात त्वचा, डोळ्यांची घ्या काळजी; नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

‘बाहुबली’ नेते स्वतः निवडणुकीला उभे राहू शकत नसल्याने पत्नीला उमेदवारी मिळवून देण्याची परंपरा बिहारमध्ये आहे. त्यांची नवी पिढीही याच वाटेने जात आहे. डॉन ते राजकीय नेता असा प्रवास करणारे आनंद मोहन हे त्याचे उदाहरण आहे. त्यांची पत्नी लव्हली आनंद ‘जेडीयू’च्या तिकिटावर शिवहर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. मोहन यांनी १९९६ आणि १९९८ मध्ये शिवहरचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९४ मध्ये गोपाळगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. कृष्णया यांच्या हत्या प्रकरणात मोहन १६ वर्षे तुरुंगात होते. गेल्या वर्षी सात एप्रिलला त्यांची सुटका झाली. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कारागृहात बंदिस्त असलेल्या दोषींना सुटकेनंतर सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यास बंदी आहे. या नियमामुळे मोहन निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे लव्हली आनंद आखाड्यात उतरल्या आहेत.

Lok Sabha Election
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

पक्षांतराचे फळ

१) पूर्णियाचे ‘बाहुबली’ नेते अवधेश मंडल यांची पत्नी बिमा भारती या पाच वेळा आमदार व माजी मंत्री आहेत. ‘जेडीयू’ची साथ सोडून त्या नुकत्याच ‘आरजेडी’त आल्या. या पक्षाकडून बिमा भारती यांना पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. अवधेश मंडल यांच्यावर हत्या आणि अपहरणासह १२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. बाहुबली नेते पप्पू यादव यांनीही पूर्णियातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

२) माजी आमदार रमेश कुशवाह यांची पत्नी विजयलक्ष्मी देवी यांना ‘जेडीयू’ने उमेदवारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी (मार्क्सवादी-लेनिनवादी) संबंधित कुशवाह यांनी १९९७ मध्ये ‘जेएनयू’चा विद्यार्थी नेता चंद्रशेखर याच्या हत्याप्रकरणात ‘एफआयआर’ दाखल केली होती. तेव्हापासून कुशवाह चर्चेत आले.

३) लोकसभेत सध्या सीवानचे प्रतिनिधित्व ‘जेडीयू’च्या नेत्या कवितासिंह यांच्याकडे आहे. ‘बाहुबली’ नेता अजयसिंह यांच्या त्या पत्नी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com