भाजप खासदाराने कोरोनापासून बचावासाठी दिलाय अजब सल्ला; म्हणाले...

टीम ई-सकाळ
Sunday, 19 July 2020

कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या, असे घोष यांनी सांगितले. घोष यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच टीका केली जात आहे. 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे. त्याबाबतच आता भाजप खासदार दिलीप घोष यांनी एक अजब सल्ला दिला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या, असे घोष यांनी सांगितले. घोष यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच टीका केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोना व्हायरस हे भारतातच नाही तर संपूर्ण जगावरचं संकट आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच यावर लस तयार करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या खासदार घोष यांनी गोमूत्र प्या असा सल्ला दिला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोमूत्र पिल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले घोष...

भारत हा भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गायीची पूजा करतो. मी जर गायीबद्दल बोलायला लागलो तर अनेकांना ते पटणार नाही. गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. गायीचे महत्त्व मोठे आहे. आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणे आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचे महत्त्व कसे काय लक्षात येईल.

यापूर्वीची काही वक्तव्ये...

गोमांस खाणाऱ्यांनी कुत्र्याचे मांसही खावे

दिलीप घोष यांनी यापूर्वीही अनेकदा अशी काही वक्तव्ये केली आहेत. गोमांसच्या मुद्द्यावर ते म्हणाले होते, जे लोक गोमांस खातात, त्यांनी कुत्र्यांचे मांस खावे.

जय श्री राम म्हणार नाहीत ते इतिहासजमा होणार

गुजरातपासून गुवाहटीपर्यंत, काश्‍मिरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' अशा घोषणा म्हणायला हव्यात. जे कोणी त्यास विरोध करतील, ते इतिहासजमा होतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drink cow urine to fight virus says Bengal BJP chief Dilip Ghosh