esakal | दारु प्यायल्याने कोरोना होत नाही? तज्त्र सांगतात
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

दारु प्यायल्याने कोरोना होत नाही? तज्ज्ञ सांगतात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंडीगड- कोरोनाची (corona) जागतिक साथ सुरु झाल्यापासून प्रामुख्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक संदेश पसरतो आहे आणि तो म्हणजे मद्यामुळे (liquor) कोरोनापासून बचाव होतो. प्रत्यक्षात ही अफवाच आहे आणि जनतेने त्यास बळी पडू नये असे आवाहन पंजाबमध्ये सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. के. के. तलवार ( Experts say)यांनी केले. पंजाबमधील बाधितांचा आकडा सुमारे चार लाखाच्या घरात गेला आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, मद्यप्राशनामुळे विषाणूला मारता येऊ शकते असे मानणे चुकीचे आहे. अशा गैरसमजामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. मद्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लोकांनी जास्त प्रमाणावर मद्यप्राशन केले तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, मात्र फार कमी प्रमाणात मद्य घेण्यात कोणतेही नुकसान नाही. (drinking liquor can privent corona what Experts say)

हेही वाचा: लस घेतल्यावर वंध्यत्व येईल का ते दारु पिलं तर चालेल का? अशा प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

तलवार हे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे माजी संचालक आहेत. शास्त्रीय निरीक्षणानुसार लोकांना कोरोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर दोन दिवस मद्यपान करू नये अशी शिफारस असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा संदेशाबाबतचा लोकांमधील भ्रम दूर होण्याची शक्यता आहे. तसेच असा संदेश व्हायरल करणाऱ्या लोकांवरही आळा बसण्याची शक्यता आहे.