
सासरच्या लोकांनी दोन महिन्यांपूर्वी एका विवाहितेची हत्या करून मृतदेह घरासमोरच पुरला. गल्लीत शौचालयाच्या टँकसाठी खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरला होता. महिलेच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मृत महिलेच्या भावाने सांगितलं की, बहिणीची हत्या दृश्यम पाहून केली आहे. फरीदाबादच्या रोशन नगरमध्ये ही घटना घडलीय.