
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाना आणि गोवा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची तर लडाखमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अशोक गजपथी राजू यांना गोव्याच्या राज्यपालपदी तर प्रा. आशिमकुमार घोष यांची हरियानाच्या राज्यपालपदी नेमले.