
नवी दिल्ली : अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. हा देशाला असलेला सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे त्यावर अंकुश लावण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काटेकोर गुप्तचर प्रणाली, आंतर संस्था समन्वय आणि कठोर कारवाई अशा त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यावश्यक ठरले आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी ‘डीआरआय’च्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले.