Drug trafficking : डॉक्टर म्हणाले, ...तर गेला असता तस्कर महिलेचा जीव

Drug
DrugDrug

देशातील अमली पदार्थांची तस्करी (Drug trafficking) रोखणे हे मोठे आव्हान आहे. तपास करणाऱ्यांना फसवण्यासाठी तस्कर विविध युक्त्या वापरतात. परंतु, अनेक वेळा त्यांची ही युक्ती कामी येत नाही आणि पकडले जातात. जयपूर विमानतळावर असाच प्रकार घडला. महिलेची तपासणी केली असता ती ड्रग्जच्या अनेक कॅप्सूल घेऊन आल्याचे आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे विमानतळावरील अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते.

ही महिला १९ फेब्रुवारीला सुदानहून जयपूर (Jaipur) विमानतळावर पोहोचली. विमानतळावरील सतर्क अधिकाऱ्यांना महिलेबद्दल अगोदरच माहिती मिळाली होती की, ती आपल्यासोबत ड्रग्जची (Drug trafficking) मोठी खेप घेऊन येत आहे. विमानतळावर महसूल संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने महिलेला पकडले आणि चौकशी केली. मात्र, महिलेने ड्रग्जबाबत काहीही सांगितले नाही.

Drug
युक्रेनमधून मृतदेह आणण्यावरून भाजप आमदार म्हणाले, एका मृतदेहाऐवजी...

यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी घेतली. वैद्यकीय चाचण्यांचे निकाल पाहून डीआरआयचे अधिकारी थक्क झाले. महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून ठेवल्याचे समोर आले. एवढेच नाही तर महिलेच्या पोटात ड्रग्जही लपवले होते. हे ड्रग्ज महिलेने दुबईहून आणल्याचे समोर आले आहे.

८८ कॅप्सूल काढल्या

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ड्रग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक्स-रे करण्यात आले. त्यात काही पिशव्या होत्या. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ११ दिवसांनंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्ट आणि पोटातून सुमारे ८८ कॅप्सूल (Drug trafficking) काढण्यात आले. पोटात ३० कॅप्सूल सापडले. ड्रग्जचे द्रवरूपात रूपांतर करून कॅप्सूल बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोटात ठेवलेली एक कॅप्सूल फुटली असती तर महिलेचा मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, आता याप्रकरणी तपास पथक पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com