धक्कादायक Video : लग्नाच्या बनावट पत्रिकेत, 5 कोटींचे ड्रग्ज; विमानतळावर माल जप्त

drugs cost rupees five crore seized bengaluru airport duplicate wedding invitation
drugs cost rupees five crore seized bengaluru airport duplicate wedding invitation

बेंगळुरू (कर्नाटक) : बेंगळुरूच्या विमानतळावर पकडण्यात आलेली लग्न पत्रिका ही अनिल अंबानीच्या लग्न पत्रिकेपेक्षाही महाग आहे. त्याचं कारणही तसच होतं. या पत्रिकेतून कोट्यवधी रुपयाचं ड्रग्ज तस्करी करून आणण्यात आलं होतं. विमानतळावर कस्टम ऑफिसर्सनी ही तस्करी पकडली आहे. पत्रिकेतून ऑस्ट्रेलियाला हे ड्रग्ज पाठवण्यात येत होते. 

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज, पाच कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, एका लग्नाच्या बनावट पत्रिकेतून हे ड्रग्ज लपवून आणण्यात आले होते. कोणाला संशयही येणार नाही, अशा पद्धतीनं ड्रग्ज लपवून आणण्यात आले होते. पत्रिकेवर एप्रिलमधील लग्नाची तारीख होता आणि या पत्रिका ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येत होत्या. या पत्रिकांचे पार्सल जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थांचं वजन पाच किलोच्या आसपास असून, त्याची किंमत 5 कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, पत्रिका कोणी पाठवल्या आणि त्या कोणाला देण्यात येणार होत्या. याचा तपास करण्यात येत आहे. 

दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पकडण्यात आलेल्या पत्रिकांमध्ये 43 अशा पत्रिका आहेत. याचा सारखी आणखी एक पत्रिका गेल्या आठवड्यात पकडण्यात आली होती, अशी माहिती हिंदू या वृत्तपत्राने दिली आहे. मदुराईमधील एका निर्यातदाराकडून या पत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. बेंगळुरू विमानतळावरील पत्रिकामुळं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं खूप मोठं रॅकेट असल्याचं मानलं जातंय. 

औषधांसाठी होतो वापर
पकडण्यात आलेले ड्रग्ज हे, औषधे तयार करण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. श्वसनाचे आजार, छातीत दुखणे आणि इतर छोट्या तक्रारींवरील औषधातही याचा वापर केला जातो. तसेच ऑपरेशनच्या काळात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या औषधांमध्येही याचा वापर होतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com