प्राजक्ता पोलिस व्हॅनमध्ये आली, डोलीत बसून गेली...गेवराईत विवाह 

आयुष्याच्या जोडीदारासाेबत प्राजक्ता
आयुष्याच्या जोडीदारासाेबत प्राजक्ता
Updated on

गेवराई (जि. बीड) - अनाथ मुला-मुलीचा सांभाळ करणाऱ्या बालग्राम अनाथालयातील प्राजक्ताचा विवाह सोहळा रविवारी (ता. २३) झाला. प्राजक्ताचे सुराणा परिवार व गर्जे परिवाराने कन्यादान केले. शेकडो वऱ्हाडींच्या आशीर्वादाने हा विवाह पार पडला.

बालग्राममध्ये चौदाव्या वर्षी अनाथ म्हणून दाखल झालेल्या प्राजक्ताचा संतोष गर्जे व प्रीती गर्जे यांनी मुलींप्रमाणे सांभाळ केला. प्राजक्ताचा (वय २०) विवाह लक्ष्मीबाई जयसिंग चव्हाण यांचे चिरंजीव नवनाथ (ढोक बाभूळगाव, ता. मोहोळ, जि सोलापूर) यांच्याशी पार पाडला. नवनाथ हे व्यावसायिक आहेत.

प्राजक्ताचे मानसकन्या मानून कविता व गौतम सुराणा (रा. परभणी) यांनी पालकत्व स्वीकारून विवाहाची व विवाहानंतरच्या कौटुंबिक कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी आपल्या मुलींप्रमाणे कन्यादानदेखील केले आहे. प्रीती व संतोष गर्जे यांनी सांभाळ केला.

अनाथ प्राजक्ताला कन्यादान करत आई वडिलांची उणीव भासू दिली नाही. 
विवाह प्रसंगी अनेक दानशूरांनी संसारोपयोगी साहित्य भेट दिले. या वेळी पद्मश्री रवींद्र कोल्हे, गिरीश कुलकर्णी, आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवाह प्रसंगी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद दिले. 


काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहनात आलेली अनाथ मुलगी आज अनाथालयातून सजलेल्या डोलीत जाताना पाहून पाहून मनस्वी आनंद होत आहे. 
-संतोष गर्जे, बालग्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Drama in Kej
Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.
MLA Vilas Bhumare demand financial aid
Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution
Marathi News Esakal
www.esakal.com