8 तास तलावात तरंगत होती डेडबॉडी.. पोलिसांनी बाहेर ओढल्यावर म्हणाला 'अभी हम जिंदा है..!' VIDEO VIRAL

हे प्रकरण वारंगलच्या हणमकोंडा सीमा भागातील आहे. याठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तलावात तरंगताना स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस आणि 108 रुग्णवाहिकेला माहिती दिली.
VIRAL VIDEO NEWS
VIRAL VIDEO NEWSesakal

तेलंगणा राज्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे.  तेलंगणा पोलिसांसोबत हा प्रकार घडला. एक विचित्र घटना पोलिसांसोबत घडली. हनमकोंडा येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुमारे 8 तास मृतदेह तलावाच्या काठावर पडून होता, असे स्थानिक लोकांचे सांगितले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलावाच्या काठावर लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस येताच सर्वांनी त्यांना तलावात पडलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखवले.

सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचे लोकांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि मग मृतदेहाजवळ पोहचले. पोलिसांनी तलावात पडलेल्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण पोलिसांनी त्या व्यक्तिला बाहेर काढताच तो उठून बसला, मग पोलिसांपासून हात सोडवून उठून उभा राहिला. Viral News

VIRAL VIDEO NEWS
Oath Viral Video: मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल

हे दृश्य पाहून तेथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलिस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली. सुमारे 8 तास प्रेताप्रमाणे बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पोलिसांपासून हात सोडवल्यानंतर त्या व्यक्तिने हातावर पाणी घेत तोंड धुतले. जेव्हा तो तलावातून बाहेर आला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि लोकांनी त्याला तलावात पडण्याचे कारण विचारले. सुरुवातीला ती व्यक्ती थोडी घाबरली आणि नंतर तलावात पडण्याचे कारण सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावात पडलेली व्यक्ती आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो डिझेल कॉलनी, काझीपेठ येथे राहतो आणि ग्रॅनाईटच्या खदानीत काम करतो. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, या कडाक्याच्या उन्हात दररोज 12 तास सतत काम केल्याने तो खूप थकला होता, यामुळे तो उष्मा आणि थकवा यापासून आराम मिळावा म्हणून तलावात झोपायला आला. यावेळी तो तलावात गाढ झोपीत गेला. या घटनेनंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत की पाण्याखाली एवढं गाढ कोण झोपू शकतं.?

VIRAL VIDEO NEWS
Viral VIDEO: मक्कामधील पवित्र 'काबा'समोर बुरखा घातलेल्या महिलेचा डान्स; मुस्लिम जगतात संतापाची लाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com