Only Three days liquor shop closed in Delhi
Only Three days liquor shop closed in DelhiOnly Three days liquor shop closed in Delhi

Dry Day : दिल्लीत यंदा फक्त तीन दिवस ‘ड्राय डे’; आदेश जाहीर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत यंदा फक्त तीन ड्राय डे असतील. म्हणजेच दिल्लीत वर्षभरात तीन दिवस दारूची दुकाने (liquor shop) अधिकृतपणे बंद (Only Three days closed) राहणार आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क विभागाने (Delhi Excise Department) राजधानीतील ड्राय डेची संख्या यावर्षी तीनपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी महान नेत्यांच्या जयंती आणि धार्मिक सणांसह एकूण ड्राय डेची संख्या २१ होती. (Only Three days liquor shop closed in Delhi)

उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती या दिवशीच ड्राय डे पाळला जाईल. सर्व परवानाधारक दुकाने ड्राय डेला बंद राहतील. शासन वेळोवेळी वरील ड्राय डे दिवस वगळता वर्षातील इतर कोणताही दिवस ड्राय डे (Dry Day) म्हणून घोषित करू शकेल, असे आदेशात म्हटले आहे.

उत्पादन शुल्क विभागाने आदेशात (Delhi Excise Department) म्हटले आहे की, दिल्ली उत्पादन शुल्क नियम २०१० च्या नियम ५२ मधील तरतुदींनुसार, असे आदेश देण्यात आले आहेत की २०२२ सालासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व परवानाधारकांनी दिल्लीतील दारूचे दुकाने (liquor shop) प्रजासत्ताक दिनी (२६जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर) ड्राय डे (Dry Day) म्हणून पाळले (Only Three days closed) जातील.

Only Three days liquor shop closed in Delhi
होम क्वारंटाईन : १,०७५ रुग्णांमुळे कुटुंबीयांचा जीव धोक्यात

गेल्या वर्षीपासून लागू झालेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डेची (Dry Day) संख्या कमी करण्याचा प्रस्ताव आहे. मार्च २०२१ मध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घोषणा केली होती की, दिल्ली सरकार मद्यपानाचे कायदेशीर वय २१ पर्यंत कमी करेल, किरकोळ मद्य व्यवसायातून बाहेर पडेल, चक्रव्यूह कर प्रणालीची दुरुस्ती करेल आणि कोरड्या दिवसांची संख्या कमी करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com