esakal | COVID-19 2nd vaccination dry run :जाणून घ्या दुसऱ्या अन् अंतिम ड्राय-रनबद्दलची महत्त्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination, dry run,information about vaccination

लसीकरणापूर्वी उत्तर प्रदेश आणि हरियाणा व्यतिरिक्त देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर ड्राय रनची प्रक्रिया पार पडणार आहे.

COVID-19 2nd vaccination dry run :जाणून घ्या दुसऱ्या अन् अंतिम ड्राय-रनबद्दलची महत्त्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

देशातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी (Coronavirus) सरकारने दोन लशीला मंजूरी दिली आहे. त्यानंतर देशात लसीकरण मोहिम सुरु करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झालीय. लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी देशभरात दुसऱ्यांदा ड्राय रन होणार आहे.  लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे अडथळे येतील? त्याचा सामना कसा करायचा? यासाठी 'ड्राय रन'ची प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अंतिम ड्राय रन आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना डमी लस दिली जाईल.   

Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 234 रुग्णांचा मृत्यू; राज्यात आज लसीकरणाची ड्राय रन

देशातील 736 जिल्ह्यात होणार ड्राय रन

लसीकरणापूर्वी उत्तर प्रदेश आणि हरियाणा व्यतिरिक्त देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर ड्राय रनची प्रक्रिया पार पडणार आहे. देशभरातील 736 जिल्ह्यात ड्राय रनची प्रक्रिया पार पडेल. सर्वात पहिल्यांदा कोविन एपमध्ये नोंदणी असलेल्या जिह्ल्यातील 2518 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. यातीलत 75 लोकांची ड्राय रनसाठी निवड करण्यात आली आहे. कोरोना लशीची माहिती ऑनलाईन एपवर उपलब्ध असणार आहे.