
कॉलेजची टॉपर विद्यार्थीनी, अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस आणि उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याची जवळपास ५० सर्टिफिकेट. याशिवाय १० मेडल्स मिळवले. तरीही इंटर्नशिपसाठी संधी मिळत नसल्याची खंत दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थीनीने व्यक्त केलीय. तिनं तिच्या ५० सर्टिफिकेट आणि १० मेडल्सचा एकत्रित फोटो शेअर केलाय. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.