
या तीन कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी रस्ता मोकळा केला आहे, याचा फटका देशातील कृषी व्यवसायाशी संबंधित चाळीस टक्के लोकांना बसेल, असा आरोप त्यांनी केला.
जयपूर - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांवरून आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.या तीन कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी रस्ता मोकळा केला आहे,याचा फटका देशातील कृषी व्यवसायाशी संबंधित चाळीस टक्के लोकांना बसेल, असा आरोप त्यांनी केला.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यामध्ये पिलीबंगा शहरात आयोजित किसान महापंचायतीमध्ये ते बोलत होते. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर या कृषी कायद्यांच्या माध्यमातून देशातील जनतेला मोठा धक्का देण्यात आला आहे. शेती, व्यापार, आणि कामगार या क्षेत्रांतील चाळीस टक्के लोकांना या कायद्यांचा थेट फटका बसणार असल्याचेही राहुल यांनी नमूद केले. नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा हटविण्यासाठी घेण्यात आला नव्हता हे त्याचवेळी मी सांगितले होते पण लोकांना ते समजू शकले नाही. यानंतर जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली हा लघू- मध्यम उद्योजकांवर हल्ला होता. मोदींना त्यांच्या मित्रांसाठी मार्ग मोकळा करायचा आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राहुल म्हणाले
मोदींनी आपला भूभाग चीनला दिला
मोदींना शेतकऱ्यांची ताकद माहिती नाही
संसदेमध्ये कृषी कायद्यांचे वास्तव मांडले
कृषी उद्योगास एक व्यक्ती चालवू शकत नाही
कृषी कायद्यांमुळे मंडी व्यवस्था संपेल
एकच व्यक्ती अमर्याद धान्य खरेदी करेल
काँग्रेसने अमूल आणून लोकांना रोजगार दिला
पूर्वसूचना न देताच देशभर लॉकडाउन केले
पायलट चौथ्या रांगेत
राहुल यांच्या आजच्या महापंचायतीमध्ये व्यासपीठावर सोफे आणि खुर्च्यांऐवजी खाटा मांडण्यात आल्या होत्या. राहुल यांनी ३२ मिनिटांच्या भाषणामध्ये बारावेळा मोदींचे नाव घेतले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे राहुल यांच्या शेजारी बसले होते तर सचिन पायलट यांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.