पुरस्थितीमुळे बेळगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी रांगा  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 August 2019

बेळगाव - शहरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये अद्यापही पुराचे पाणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे पाणी पुरवठा मंडळ आणि विविध संघटनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. पण टँकर गल्लीत येताच महिलांची पाण्यासाठी झुंबड होत आहे.

पुरस्थितीमुळे हिंडलगा आणि हिडकल येथील पंप हाऊस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याचा फटका शहरातील लाखो नागरिकांना बसला आहे. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी चार दिवसांपासून कष्ट घेतलेल्या नागरिकांना आता पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तसेच शहरातील अनेक भागात खंडित झालेला वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही.

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल बंद पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रातही पाणी भरल्याने नागरिकांना अधिक प्रमाणात बॉटल बंद पाणी मिळणेही बंद झाले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to flood, queues for drinking water in Belgaum city