'मेट्रो मॅन' ई श्रीधरन करणार भाजप प्रवेश

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

कोलकाता ते दिल्ली मेट्रोचे कॅप्टन आणि मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवी दिल्ली - कोलकाता ते दिल्ली मेट्रोचे कॅप्टन आणि मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये भाजपची विजय यात्रा होणार आहे. यावेळी मेट्रोमॅन श्रीधरन यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिकता पार पाडली जाणार आहे. 

केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 21 पासून विजय यात्रा काढली जाणार आहे. या विजय यात्रेवेळी ई श्रीधरन यांचा भाजप प्रवेश होईल असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

ई श्रीधरन अधिकृतपणे 21 फेब्रुवारीला भाजपचे सदस्यत्व स्वीकारतील.  श्रीधरन यांनी मेट्रोच्या कामात मोठं योगदान दिलं असून त्यांना पद्म श्री आणि पद्म विभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. 

हे वाचा - पेट्रोल दरवाढीची चिंता; पंतप्रधान मोदींनी तेल उत्पादक देशांना दिला सल्ला

मेट्रो मॅन नावाने प्रसिद्ध असलले ई श्रीधरन यांनी कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठं योगदान दिलं आहे. विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्स सरकारनेसुद्धा गौरवलं आहे. 2005 मध्ये त्यांना 'Chavalier de la Legion d’honneur' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने ई श्रीधरन यांना आशियाचा हिरो असंही म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E Sreedharan to join BJP on 21 feb in kerala vijay yatra