gobar income uttar pradesh
sakal
उत्तर प्रदेशात आता शेण केवळ खत म्हणून नाही, तर चक्क इंधन म्हणून अर्थव्यवस्थेला गती देणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अशा एका ऊर्जा मॉडेलवर काम सुरू आहे, जिथे शेणापासून 'कंप्रेस्ड बायोगॅस' (CBG) तयार केला जाईल. या प्रकल्पामुळे पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी होईलच, पण त्यासोबतच राज्यातील हजारो गोपालकांसाठी उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी मार्ग मोकळा होणार आहे.