esakal | जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये आज भूकंपाचे हादरे; पहाटे पावणेपाचला हादरली जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

earthqauke

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये आज भूकंपाचे हादरे; पहाटे पावणेपाचला हादरली जमीन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले आहेत. रविवारी सकाळी लोक साखर झोपेत असताना जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये भूकंपाच्या हादऱ्यांनी लोक हडबडून जागे झाले.  याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. रविवारी सकाळी चार वाजून 40 मिनिटांनी डोडाच्या जवळ भूकंपाचे झटके बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या सांगण्यानुसार, हा भूकंप 2.9  रिश्टर स्केल इतका होता.

या भूकंपामुळे कसल्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्तहानी झाल्याची बातमी नाहीये. याआधी शनिवारी लडाखमध्ये सकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाच्या हादऱ्यांनी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती.
हेही वाचा - कोरोना वाढल्याने यंत्रणेची धावपळ

भूकंप आल्यावर काय कराल?

  • भूकंप आल्यानंतर घरी असाल तर जमिनीवर बसा
  • जर आपल्या घरी टेबल, फर्नीचर असेल तर त्याच्या खाली जाऊन हाताने डोके झाका
  • भूकंप येत असताना घराच्या आतच रहा आणि जेंव्हा झटके कमी होत आहेत, असं वाटेल तेंव्हाच घरातून बाहेर पडा
  • भूंकपाच्या दरम्यान घरातील सगळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करा


भूकंप आल्यावर 'हे' करणे टाळा

  • भूकंप आल्यावर जर आपण घराबाहेर असाल तर उंच इमारती आणि वीजेच्या खांबापासून लांब रहा
  • भूकंप आल्यावर जर घरी असाल तर बाहेर पडू नका. जिथे असाल तिथेच स्वत:ला सुरक्षित करा
  • भूकंप आल्यावर घरातील दरवाजे, खिडक्या आणि भिंतीपासून लांब रहा
  • भूकंप आल्यावर लिफ्टचा वापर चुकूनही करु नका
     
loading image