Amit Shah : अमित शाहांची तमा न बाळगता भडकल्या बॅनर्जी; नेमकं झालं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

Amit Shah : अमित शाहांची तमा न बाळगता भडकल्या बॅनर्जी; नेमकं झालं काय?

कोलकाताः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे आज झोनल काऊंसिलची बैठक घेतली. यामध्ये पश्चिम बंगालसह झारखंड, ओडिसा आणि सिक्कीम या राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. अमित शाह हे या बैठकीचे अध्यक्ष होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची या बैठकीला उपस्थिती होती. बैठकीदरम्यान बीएसएफच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा ममता यांनी अमित शाह यांच्यासमोरच नाराजी जाहीर करत करत संताप व्यक्त केला.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बीएसएफला ५० किलोमीटर परिघात कारवाई करण्याचा अधिकार दिल्याने सामान्य जनतेला त्रास होत आहे. लोकांना अधिकाऱ्यांसोबत ताळमेळ ठेवणं अवघड जात आहे. बीएसएफ राज्य सरकारला सहकार्य करीत नसल्याचा ठपका ममता बॅनर्जी यांनी ठेवला.

केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांतर्गत बीएसएफला कारवाईसाठी मॅजिस्ट्रेटच्या आदेशाची किंवा गरज भासत नाही. जुन्या नियमामध्ये बीएसएफ १५ किमोमीटरच्या आतच कारवाई करु शकत होतं. या नव्या कायद्याचा त्रास होत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं.

ही चर्चा सुरु असतांना बीएसएफच्या कामकाजावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तमा न बाळगता त्यांच्यासमोरच त्या बीएसएफच्या अधिकाऱ्यांवर भडकल्या.

टॅग्स :Mamata BanerjeeAmit Shah