नवरा-बायकोचं भांडण बेतलं चिमुरड्याच्या जीवावर; पतीने मुलाला पहिल्या मजल्यावरून फेकलं अन्...

घरोघरी पती-पत्नीचं भांडणं होणं हे काही नवीन नाही. मात्र, अनेकदा हे भांडण विकोपाला जातं.
crime
crime sakal

घरोघरी पती-पत्नीचं भांडणं होणं हे काही नवीन नाही. मात्र, अनेकदा हे भांडण विकोपाला जातं आणि जे घडायला नको ते घडतं. असाच काहीसाप्रकार देशाची राजधानी दिल्लीतून समोर आला आहे. दिल्लीतील कालकाजी परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

पती-पत्नीच्या भांडणात रागाच्या भरात पतीने पोटच्या मुलाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आणि त्यानंतर स्वतः तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

crime
नवरा-बायको 'या' 4 गोष्टी फक्त त्यांच्या मित्रमंडळांशी शेअर करतात, वाचून बसेल धक्का

घटना नेमकी काय?

दिल्लीतील कालकाजी परिसरातील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री एका 30 व्यक्तीवर पत्नीशी भांडण झाल्यानंतर आपल्या 2 वर्षाच्या मुलाला पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून, दोघांवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मान सिंह (30 वर्षे) असे हे धक्कादायक कृत्य करणाऱ्या पित्याचे नाव आहे.

crime
Husband-Wife : बटाट्याचा पराठा, भांडण अन्....; योगींच्या राज्यात घडली हादरवणारी घटना

मानसिंग आणि त्याची पत्नी पूजा घरगुती वादामुळे वेगळे राहत होते. पूजा सध्या तिच्या दोन मुलांसह कालकाजी येथे आजीच्या घरी राहत आहे. शुक्रवारी सायंकाळी 6-7 च्या सुमारास मान सिंह तेथे पोहोचला. याठिकाणी मानसिंगने दारूच्या नशेत पत्नीशी भांडण सुरू होते. त्यावेळी तो अचानक मुलासह पहिल्या मजल्यावर गेला आणि त्याने क्षणात मुलाला खाली फेकले. यानंतर त्याने स्वतः इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com