
नवी दिल्ली : बिहारमध्ये विशेष मतदारयादी पडताळणी मोहिमेपाठोपाठ अन्य राज्यांमधील मतदारयाद्यांवरून राजकारण तापले असताना निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधींना ‘नियमानुसार प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा खोट्या आरोपांसाठी देशाची माफी मागा,’ असे आव्हान दिले आहे. तसेच बिहारच्या मसुदायादीवर नऊ दिवसांनंतरही एकाही राजकीय पक्षाने अद्याप आक्षेप घेतलेला नाही, असाही दावा निवडणूक आयोगातर्फे आज करण्यात आला.