बंगळूर : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सक्रियपणे कार्यरत नसलेल्या आठ राजकीय पक्षांना नोंदणी यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूर शहराचे अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले उपायुक्त जगदीश जी. यांनी सांगितले की, या संदर्भात १८ जुलै रोजी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी होईल.