Election Commission: निवडणूक आयोग अखेर झुकलं! राहुल गांधींच्या मागणीनुसार महाराष्ट्र, हरयाणाच्या मतदार याद्यांचा देणार डेटा

Election Commission:लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या होत्या, याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते.
Rahul Gandhi on Election Commission
Rahul Gandhi on Election CommissionESakal
Updated on

Election Commission: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकतेच वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र, हरयाणासह दिल्ली अन् इतर ठिकाणी पार पडलेल्या विधानसभा निवडणुका कशा फिक्स करण्यात आल्या होत्या, याची काही आकडेवारी देऊन आरोप केले होते. यामुळं देशभरात यावरुन चर्चा सुरु झाली. स्वतंत्र संविधानिक संस्था असलेल्या भारतीय निवडणूक आयोगावर त्यामुळं पक्षपातीपणाचे आरोप होऊ लागले.

यापार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या मागणीनुसार तसंच काँग्रेसनं दाखल केलेल्या याचिकेला अनुसरुन महाराष्ट्र आणि हरयाणा या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचं मान्य केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. तसंच आणखी काही मागणीही केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com